Friday 8 April 2011

विंडोज XP मध्ये लपविलेले प्रोग्रॅम्स्




आपण वापरत असलेल्या विंडोज XP मध्ये आपणास माहीत नसलेले अनेक प्रोग्रॅम लपविलेले असतात. हे प्रोग्रॅम सर्वांच्या उपयोगाचे नसल्याने ते लपविलेले असतात. आवश्यकतेनुसार हे प्रोग्रॅम त्या-त्या क्षेत्रातील जाणकार लोकांतर्फे वापरले जातात.


अशाचा काही विंडोज XP मध्ये लपविलेल्या प्रोग्रामची यादी खाली दिली आहे. यांचा वापर तुम्हाला त्या बद्दल चांगली माहिती असेल तरच करावा. कारण तुमच्या एखाद्या चुकीमुळे विंडोज मध्ये एखादा छोटा अथवा मोठा प्रॉब्लेम निर्माण होवू शकतो.

खाली दिलेले प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी विंडोजमधील स्टार्ट बटणावरील ' Run ' या जागेमध्ये खाली दिलेल्या प्रोग्रामच्या शॉर्टकट टाईप करून एंटर मारल्यास तो प्रोग्रॅम सुरू होईल.



१. Character Map - charmap (कि-बोर्डवर नसलेले अनेक निरनिराळी चिन्हे आणण्यासाठी)

२. Disk Cleanup - cleanmgr (कॉम्प्युटरमधील अनावश्यक फाइली नष्ट करणारा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

३. Clipboard Viewer - clipbrd (कॉपी केलेली गोष्ट पाहण्यासाठी तसेच साठविण्याचा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

४. Dr Watson - drwtsn32 (विशिष्ट प्रोग्राममधिल प्रॉब्लेम शोधणारा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

५. DirectX Diagnosis - dxdiag (कॉम्प्युटरमधील साऊंड आणि विडिओ कार्ड बद्दलची माहिती पाहण्यासाठी ).
६. Private character editor - eudcedit (स्वतःचा नविन अक्षर तयार करण्यासाठीचा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

७. IExpress Wizard - iexpress (आपणहून उघडणारा आणि इंस्टॉल करणारा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

८. Microsoft Synchronization Manager - mobsync (नेटवर्किंगमध्ये असलेल्या कॉम्प्युटरमधील फाइली ऑफलाईन असताना एकत्र करण्यासाठीचा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

९. Windows Media Player 5.1 - mplay32 (विंडोज मेडिया प्लेअरचे जुने व्हर्शन सुरू करण्यासाठी)

१०. ODBC Data Source Administrator - odbcad32 (डेटाबेस संबंधीचा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

११. Object Packager - packager (आपल्या कॉम्प्युटरमधील अंतर्गत व्यवस्थेची माहिती पाहण्यासाठीचा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

१२. Registry Editor - regedt32 OR regedit (विंडोजमधील सॉफ्टवेअरच्या अंतर्गत नोंदी पाहण्यासाठीचा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)  
१३. Network shared folder wizard - shrpubw (नेटवर्किंगमध्ये असलेल्या कॉम्प्युटरमध्ये देवाण-घेवाणीचा फोल्डर बनविण्यासाठी)

१४. File siganture verification tool - sigverif (कॉम्प्युटरमधील डिजीटल सिग्नेचर पडताळण्याचा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

१५. Volume Contro - sndvol32 (वॉल्युम कमी-जास्त करण्याचा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

१६. System Configuration Editor - sysedit (विंडोजमधील System.ini, Win.ini तसेच इतर फाइली उघडण्यासाठी)

१७. Microsoft Telnet Client - telnet (मायक्रोसॉफ्टचा टेलनेट प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

१८. Driver Verifier Manager - verifier (विंडोजमधील सॉफ्टवेअर तसेच हार्डवेअरच्या ड्राईव्हर फाइली पडताळणारा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)
१९. Windows for Workgroups Chat - winchat (जुन्या विंडोज एन.टी मध्ये नेटवर्किंग कॉम्प्युटरमध्ये चॅटींगसाठी वापरला जाणारा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

२०. System configuration - msconfig (विंडोजचे सुरुवातीला सुरू होणारे प्रोग्रॅम हाताळणारा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

२१. Group Policy - gpedit.msc (विंडोजमधील काही विशिष्ट प्रोग्रामच्या सेटींग्स् बदलण्याचा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)
  

Tuesday 5 April 2011

ज़रूर वाचावे आसे काही ....

E-Mail Accounts ची माहिती :
जर तुमचं अकाऊंट Access केलं गेलं नाही तर Gamil 9 महिन्यात Delete करते, तर Hotmail 270 दिवसात Delete करते.
Account धारकाचा मृत्यु झाल्यास काय करावे? त्याच्या अशा अकाऊंटसंबंधी प्रत्येक EMail कंपनीचे वेगवेगळे नियम खालीलप्रमाणे आहेत.


Gmail :
Account धारकाचा मृत्यु झाला तर Gmail त्याच्या नातेवाईकांना Email Access देते. नातेवाईकाने विनंती केल्यास Account Delete केले जाते. नातेवाईकाला Email Access मिळविण्यासाठी खालील बाबींची पुर्तता करावी लागते.
१. नातेवाईकाचा पुर्ण पत्ता, Verification साठी नातेवाईकाचा दुसरा Active Email ID. 
२. मृत्यु झालेल्या माणसाचा E mail ID
३. मृत्यु झालेल्या माणसाने नातेवाईकाला पाठविलेला एखादा E mail
४. मृत्युचे प्रमाणपत्र.
५. मृत्यु झालेल्या माणसाचे नातेवाईक असल्याचा पुरावा.


Hotmail :
Same as above. जर Email वापरणारयाचा मृत्यु झाला तर Hotmail नातेवाईकाला Access देते. विनंतीवरुन Delete सुद्धा करते. त्यासाठी Same वरील बाबींची पुर्तता करावी लागते.
Yahoo :
 Yahoo चे नियम याबाबतीत खुप कडक आहेत. Account धारकाचा मृत्यु झाल्यास नातेवाईकाच्या विनंतीवरुन Account Delete करते. पण Access देत नाही.
Facebook :
 Facebook वापरणारयाचा मृत्यु झाला तर Account Access देत नाही. परंतु नातेवाईकाने विनंती केल्यास सदर Facebook Account " Memorable Account " म्हणुन जतन केले जाते.
Memorablisation या Feature मध्ये एखाद्याच्या मृत्युनंतर त्याच्या कुटुंबाला Profile Page वर Virtual Tribute वाहता येते.
Myspace :
Account धारकाचा मृत्यु झाल्यास नियम कडक आहेत. फक्त नातेवाईकांच्या विनंतीवरुन Account Delete करतात. पण Access देत नाहीत. Myspace मध्ये जर एखाद्याने स्वत:चा Data आपल्या कुटुंबासोबत Share करण्यासाठी परवानगी मागितली तर तशी ती देता येते.
 

कॉम्प्युटर स्लो झाल्यास रिस्टार्ट करायचे टाळा ....

बर्‍याच वेळेस कॉम्प्युटरवर भरपूर काम केल्याने अथवा भरपूर निरनिराळे सॉफ्टवेअर्स उघडून काम केल्याने कॉम्प्युटर त्या वेळेस थोडासा स्लो होतो म्हणजेच थोडासा हळू चालू लागतो. त्याची झालेली संथ गती आपल्या लक्षात आल्यानंतर आपण कॉम्प्युटर रिस्टार्ट करतो म्हणजेच बंद करुन पून्हा सुरु करतो. जेणे करुन त्याच्या मेमरी मध्ये निर्माण झालेला गुंता सुटून तो पुन्हा व्यवस्थित चालू लागतो. या परीस्थितीवर चांगला पर्याय म्हणून आपण नेहमी तो कॉम्प्युटर बंद करुन पुन्हा सुरु करतो, म्हणजेच 'रीस्टार्ट' करतो. मग या कॉम्प्युटर बंद करुन पुन्हा सुरु करण्याच्या वेळेमध्ये आपली २-३ मिनिटे वाया जातात.

काम करताना थोडासा स्लो झालेला कॉम्प्युटर बंद करुन पुन्हा सुरु केल्याने कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये झालेला गुंता सुटून तो पुन्हा व्यवस्थित चालू लागतो. अशाप्रकारे कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये झालेला गुंता सोडविण्यावर कॉम्प्युटर 'रीस्टार्ट' करणे हा एकच पर्याय नाही. कॉम्प्युटर 'रीस्टार्ट' न करता देखिल स्लो झालेला कॉम्प्युटर व्यवस्थित करता येतो.
असे करताना कॉम्प्युटरमधिल मेमरीमध्ये झालेला गुंता सोडविण्याची क्रिया खाली दिली आहे. 
१. कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर माऊसचे राईटक्लिक करुन येणार्‍या चौकोनातील 'New' या विभागातील "Shortcut" या नावावर क्लिक करा.

 २. आता आपल्यासमोर 'Create Shortcut' चा चौकोन उघडेल. त्यातील 'Type tye location of item:' च्या खालील जागेमध्ये खाली दिलेली ठळक अक्षरातील ओळ कॉपी करुन त्याजागी पेस्ट करा व खालिल Next > या बटणावर क्लिक करा.

copy this code in red color ...
%windir%\system32\rundll32.exe advapi32.dll,ProcessIdleTasks


३. आता पुढील चौकोनामध्ये 'Type a name for this shortcut' च्या खालिल जागेमध्ये "Clear Memory" असे टाईप करुन खालिल Finish या बटणावर क्लिक करा.
४. असे केल्याने आता कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर "Clear Memory" नावाची एक फाईल तयार होईल. मग जेव्हा-जेव्हा आपणास कॉम्प्युटर स्लो झालेला जाणवेल तेव्हा कॉम्प्युटर 'रीस्टार्ट' न करता फक्त या फाईलीवर डबलक्लिक करुन पुन्हा कॉम्प्युटरचा वेग सुरळीत करा.


तुमचा संगणक पुरुष आहे कि स्त्री ते तुम्हाला पुढील ट्रिक वरून कळेल .....




१. नोटपेंड (notepad) उघडा
२. आता खालील कोड कॉपी करून तिथे पेस्ट करा .

CreateObject("SAPI.SpVoice").Speak"I love YOU"

३. आता हि फाईल love.vbs या नावाने सेव करा

४. आता त्या फाईल वर डबल क्लिक करून ती उघडा


५. आता स्पीकर कडे लक्ष द्या . तुम्हला "आय लव यु " ऐकायला येयील . जर हा पुरुषाचा आवाज असेल तर तुमचा संगणक पुरुष आहे अथवा स्त्री आहे .

Monday 4 April 2011

इंटरनेट वर किव्वा कोणत्याही ब्रावझर वर स्क्रीन चे चित्र (screen shot )घ्या ...

1. तुम्हाला हव्या असलेल्या पेज वर या ज्याचा तुम्हाला screen shot घ्यायचा आहे .
2. तुमच्या कीबोर्ड वर असलेले Print screen ( prt scr) हे बटन दाबा जे F12 च्या बाजूला असते .
3. मग (Photo shop,MS-Paint,Paint-shop...etc) यापैकी काहीही उघडून तुम्ही तो फोटो तिथे पेस्ट करा  आणि एडीट करून तुमच्या कम्प्युटर मध्ये सेव करू शकता ...





उदाहरण  :-  






अश्या प्रकारे तुम्ही screen shot घेऊ शकता ..........



Thursday 31 March 2011

इंटरनेट एक्सप्लोररवर आपले नाव आणा !



खाली दिल्याप्रमाणे केल्यास इंटरनेट एक्सप्लोररवर आपले नाव आणता येईल.
१) ''स्टार्ट' बटणावरील ' रन (Run...) ' या विभागावर क्लिक करा आणि त्याजागेमध्ये gpedit.msc टाईप करुन 'OK' बटणावर क्लिक करा.

२) आता आपल्यासमोर "Group Policy" नावाचा प्रोग्रॅम सुरु होईल.

३) या "Group Policy" प्रोग्रॅमच्या डाव्या बाजूच्या जागेतील Local Computer Policy मधिल User Configuration मधिल Windows Settings मधिल Internet Explorer Maintenance मधिल Browser User Interface वर क्लिक करा.

४) आता उजव्या बाजूच्या जागेतील " Browser Title " वर डबल क्लिक करा.

खाली दिल्याप्रमाणे केल्यास इंटरनेट एक्सप्लोररवर आपले नाव आणता येईल.
१) ''स्टार्ट' बटणावरील ' रन (Run) या विभागावर क्लिक करा आणि त्याजागेमध्ये gpedit.msc टाईप करुन OK' बटणावर क्लिक करा.
२) आता आपल्यासमोर "Group Policy" नावाचा प्रोग्रॅम सुरु होईल.
३) या "Group Policy" प्रोग्रॅमच्या डाव्या बाजूच्या जागेतील Local Computer Policy मधिल User Configuration मधिल Windows Settings मधिल Internet Explorer Maintenance मधिल Browser User Interface वर क्लिक करा.
४) आता उजव्या बाजूच्या जागेतील " Browser Title " वर डबल क्लिक करा.
५) आता आपल्यासमोर Browser Title चा चौकोन उघडेल. त्यातील ' Customize Title Bars ' च्या समोरील बॉक्स वर क्लिक करा आणि खालील जागेमध्ये आपले नाव लिहून त्याखालील 'OK' बटणावर क्लिक करा.


तुम्हाला माहित आहे का ?

व्हर्चुअल कि-बोर्ड  


टच स्क्रिन मॉनिटर बद्दल आपणास माहित असेलच. पण कधी व्हर्चुअल कि-बोर्ड बद्दल ऐकले आहे का तूम्ही ?

                                            
                                                 

वर दिलेल्या चित्रामध्ये पहा. तुम्हाला अजुन काही सांगण्याची गरजच पडणार नाही, आणि असे देखिल असू शकते हे तुम्हाला कळेल. या कि-बोर्ड बद्दल अधिक माहितीसाठी
http://www.virtual-laser-keyboard.com/